भाजपा जि.प. गटनेतेपदी पोपट भोळे यांची निवड

0

जळगाव । जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आता सत्ता स्थापनेला वेग आला आहे. जिल्हा परिषदेत भाजपला बहुमतासाठी 34 सदस्यांची आवश्यकता आहे. सत्ता स्थापनेसाठी गट असणे आवश्यक असल्याने प्रत्येक पक्षाने गट तयार करायला सुरुवात केली आहे.

शनिवारी भाजपाची गट नोंदणी करण्यात आली. पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत चाळीसगाव येथील पोपट एकनाथ भोळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली . मधुकर काटे यांनी भोळेंच्या नावाची सूचना मांडली तिला नंदु महाजन यांनी अनुमोदन दिले. गटनेते निवडी संबंधीची माहिती वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आली आहे. रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यातील पंचायत समिती गटाची नोंदणी सोमवारी 6 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली. याप्रसंगी खासदार रक्षा खडसेंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.