भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळेंना धमकी देणार्‍या अपप्रवृत्तीचा निषेध

0

फैजपूर : भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून 33 दिवसानंतर खून करण्याची धमकी जळगाव येथील राजेंद्र आर.पवार नामक इसमाने दिल्याने या घटनेचा फैजपूर भाजपातर्फे निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला. संबंधितावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची व हरीभाऊंना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनावर यांच्या स्वाक्षर्‍या
या निवेदनावर फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, नगरपालिका भाजपा गट नेते मिलिंद वाघूळदे, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, रवींद्र होले, संजय सराफ, प्रतीक वारके, नगरसेविका शकुंतला भारंबे, पप्पू चौधरी, दीपक होले, हरीभाऊ सराफ, नितीन बोरोले, सुनील दुसाने, संदीप होले, श्याम भंगाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहे. दरम्यान संचारबंदी सुरू असल्याने निवेदन अध्यक्ष अनंता नेहेते, नितीन नेमाडे, संजय सराफ, प्रतीक वारके, सुनील दुसाने आदींनी सोशल डिस्टन्स पाळत फैजपूर सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना दिले.

Copy