भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळेंना मिळालेल्या धमकीचा निषेध

0

रावेर तालुका भाजपाचे तहसील व पोलिस प्रशासनास निवेदन : दोषींवर कठोर कारवाईची मागणी

रावेर : भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा रावेर तालुका भाजपाकडून निषेध करण्यात आला आहे. माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना 33 दिवसानंतर खुन करण्याची धमकी जळगाव येथील राजेंद्र आर.पवार या इसमाने मोबाईलद्वारे संदेश पाठवून दिल्याने त्याचा रावेर तालुका भाजपातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, फैजपूर उपनिभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना रावेर तालुका भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस चुडामण पाटील, उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, दिलीप पाटील आदींनी निवेदन दिले.

धमकी देणार्‍यावर कठोर कारवाईची गरज
धमकी देणार्‍या इसमाचा पोलिसांनी शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची करण्याची गरज असून आपला पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात कुणाशीही वैमनस्य नसल्याचे भूमिका जावळे यांनी मांडली आहे.

Copy