भाजपा जिल्हाध्यक्षांना धमकी देणार्‍यावर कठोर कारवाई व्हावी

0

यावल : भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना जळगावातील एका व्यक्तीने मोबाईलवर संदेश पाठवत 33 दिवसानंतर खून करण्याची धमकी दिल्याने या घटनेचा यावल तालुका भाजपातर्फे निषेध करण्यात आला. दोषींवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी यावल तालुका भाजपा तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे केली आहे.

मनोविकृताचा शोध घेवून कारवाईची मागणी
यापूर्वीदेखील अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना राजेंद्र पवार नामक व्यक्तीच्या मोबाईल वरून संदेश पाठवत जिवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने या इसमाचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच याच इसमाने यावल नगरपरीषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांना देखील गेल्या तीन ते चार दिवसापूर्वीच व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती याबाबत यावल पोलिस स्टेशनला राकेश कोलते यांनी तक्रार दिल्यावरून या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy