भाजपा गटनेतेपदी मुन्ना तेली

0

भुसावळ : सद्य येथील पालिकेच्या भाजपा गटनेतेपदी अखेर अपक्ष नगरसेवक हाजी मुन्ना इब्राहीम तेली यांची वर्णी लागली असून उपगटनेतेपदी शोभा अरुण नेमाडे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवार 20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नगराध्यक्ष रमण भोळे, मनोज बियाणी, प्रा. सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, किरण कोलते, रवींद्र खरात, प्रा. दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, रमेश नागराणी, पिंटू ठाकूर, राजेंद्र नाटकर, अ‍ॅड. बोधराज चौधरी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

येथील नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदासाठी अनेक जण इच्छुक होते. यासाठी अनेकांनी वरिष्ठांकडून फिल्डींग लावली होती. तसेच अपक्ष नगरसेवकाची गटनेतेपदी निवड केल्याने तांत्रीक अडचण निर्माण होवून अपात्रतेचे भुत मानगुटीवर बसण्याची भिती काही नगरसेवकांमध्ये होती. त्यामुळे तेली यांच्या नावाला नगरसेवकांचा विरोध होता. मात्र नाराजी नाट्यानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार अपक्ष नगरसेवक हाजी मुन्ना इब्राहीम तेली यांची गटनेतेपदी निवड केली तर उपगटनेतेपदी शोभा नेमाडे यांची वर्णी लागली आहे.