भाजपा आमदार पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा फैजपूरातही निषेध

0

फैजपूर : खासदार शरद पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणार्‍या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा फैजपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीन जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी पडळकराविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन फैजपूर पोलिस ठाण्यात देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिका गटनेता शेख कुर्बान, हाजी करीम फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, प्रवक्ता शेख शाकिर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अशोक भालेराव, युवराज गाढे, देविदास साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Copy