भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांच्या नावाने खंडणी मागणाऱ्याला अटक

0

पिंपरी : माजी मंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयात फोन करुन २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला आज गुरुवारी २३ रोजी निगडी पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सौरभ अस्तूर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने निगडी येथील एका रुग्णालयात फोन करून २५ लाख रुपये मागितले, पैसे नाही दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात १७ जुलैला गुन्ह्याची पोलिसांनी नोंद केली.

चोरीस गेलेल्या फोनवरून एकाने रुग्णालयात फोन केल्याचे उघड झाले. त्यानंतर आज गुरुवारी पहाटे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. निगडी पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.