भाजपात खडसे अस्वस्थ, त्यांनी निर्णय घ्यावा: संजय राऊत

0

नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांनी अनेकवेळा पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान काल खडसे हे नागपुरात दाखल झाले असून ते विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खडसे हे भाजपात अस्वस्थ आहेत, मात्र पक्ष सोडण्याबाबतचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे असे विधान राऊत यांनी केला आहे.

एका पक्षात अनेक वर्ष खडसे यांनी काम केले आहे. निष्ठावंत नेते म्हणून खडसे ओळखले जातात, मात्र आज त्यांच्यावर पक्षात अन्याय सुरु आहे. त्यांच्या बोलण्यातूनच ते दिसून येते. त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ असे म्हणत राऊत यांनी खडसेंना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. अनेक पक्षांना ते आपल्या पक्षात यावे असे वाटत आहे, मात्र त्यांनी निर्णय घ्यावा असे राऊत यांनी म्हटले आहे. एका पक्षात राहिल्यावर खडसे यांच्या मनात अश भावना आले असतील तर त्यांच्या भावना समजून घेतल्या पहिले. त्यांची अश्वष्ट मी बघितली आहे. खडसे हे शिवसेनेत आले तर आम्हाला फायदा होईल.