भाजपातून कुणी गेले तरी काही फरक पडत नाही

0

जामनेर येथील बुथ संपर्क अभियान मेळाव्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा विरोधकांना टोला

जामनेर: जामनेर तालुकासह संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये 75% ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आले असून आता येणार्‍या काळात सहकार क्षेत्रातील निवडणुकीसाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असे आवाहन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी भाजपा तालुका बैठकीत बोलताना केले. दरम्यान मी पक्षामुळे सहा वेळा आमदार झालो. पक्षच मोठा आहे. त्यामुळे कुणी आले-गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही असा टोलाही आमदार महाजन यांनी लगावला.

सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन
बाजीराव मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी भूत संपर्क आंब्यांना अंतर्गत भाजपा तालुका बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्ता हा तोलामोलाचा असून कार्यकर्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे येणार्‍या काळात आपण गावपातळीवर गटप्रमुख, गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख यांनी नियोजन करून गावातील शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचलो पाहिजे. त्यामुळे येणार्‍या काळात कोणत्याही निवडणुका जिंकणे आपल्याला अशक्य होणार नाही. त्यामुळे आजच सर्वांनी कामाला लागा असे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना राज्यात शेतकर्‍यांना कधी विजेबाबत डिवचण्याच आले नाही. मात्र सरकार जाताच आज ट्रांसफार्मर मिळत नाही, लाईट मिळत नाही, यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. ह्या राज्य सरकारातील मंत्री एक घरात बसून काम करतात. त्यामुळे त्यांना काही एक देणंघेणं नाही फक्त आम्ही तुमचे कैवारी असल्याच्या केविलवाणा प्रकार विरोधी पक्षातील लोक करत असल्याची टिका त्यांनी केली. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करणारे पार्टी असून सगळे आम्ही सोबतच आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक नंबरचा झाला असून आपण सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन आमदार महाजन यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष अजय भोळे, डॉ.विजय धांडे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी अध्यक्ष दिलीप सोनार, माजी जि प अध्यक्ष दिलीप खोडपे, प्रयाग कोळी, नगर पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, उत्तम थोरात, गोविंद अग्रवाल, रमेश नाईक, जि प सदस्य अमित देशमुख, सुनिता पाटील, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, माजी पंचायत समिती सभापती छगन झाल्टे, पंचायत समिती उपसभापती सुरेश लोखंडे, पंचायत समिती सदस्य गोपाल नाईक, तुकाराम निकम, भाजपा शहराध्यक्ष आतिश झाल्टे, भाजपा सरचिटणीस रवींद्र झाल्टे, आनंदा लाव रे, नगरसेवक बाबुराव हिवाळे, विलास पाटील, नवल पाटील, कमलाकर पाटील, बाळू चव्हाण, संजय देशमुख, सुरेश बोरसे, अ‍ॅड. सुधीर साठे, राजेंद्र चौधरी, बाबुराव वराळे, जे.के. चव्हाण, राजधर पांढरे, सुहास पाटील, प्रल्हाद पाटील, खलील शेख, समाधान पाटील, रामेश्वर पाटील, यांच्यासह भाजपा पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Copy