भाजपाच्या प्रचारावर रिपब्लिकन पार्टीचा बहिष्कार – अडकमोल

0

जळगाव । केंद्रात व राज्यात मित्रपक्ष रिपाइं(अ)ला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत शेवटपर्यंत वार्‍यावर झुलवत ठेवले असल्याचे रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी सांगितले. भाजपाकडे जि.प.गट राखीव, पं.स. गण अशा एकुण ३५ जागांचे व उमेदवारांची नावे भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना दिली होती. तसेच ना.गिरीष महाजन यांनीही याबाबत आश्‍वासन दिले होते. त्या अनुषंगाने जि.प.गट व पंचायत समिती गणामध्ये रिपाइंचे सक्षम व सक्रीय कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतू त्याच जागेवर भाजपाने त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होवून संताप व्यक्त होत आहे. मित्रपक्षाच्या नात्याने रिपाइंने 35 जागांची मागणी केली. मात्र भाजपाने ऐनवेळी जागा न सोडल्याने विश्‍वासघात भाजपने केला त्यामुळे भाजपाच्या कोणत्याही निवडणूकीत सहभाग नसल्याचा असे रिपाइंचे महानगरप्रमुख अडकमोल यांनी कळविले आहे.