भाजपाच्या ओबीसी मोर्चा सरचिटणीसपदी अजय भोळे

0

भुसावळ : येथील भारतीय जनता पार्टी इतर मागासवर्गीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी कार्यकारणी जाहिर केली.यात महाराष्ट्र सरचिटणीसपदी अजय भोळे यांची नियुक्ती करण्यात आली.यापुर्वी अजय भोळे यांनी भाजयु मोर्चा प्रसिध्द प्रमुख भुसावळ शहर, भाजपा भुसावळ शहर सरचिटणीस, भाजपा भुसावळ शहरध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख भुसावळ विधानसभा, भाजपा जिल्हा चिटणीस , भाजपा पक्षाचे तीन वेळा नगरसेवक, नगर पालिका गटनेता, औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक 2008,डि.आर.यु.सी.सी मेंबर सेट्रल रेल्वे भुसावळ 2009,कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक मनपा निवडणूक 2015-16, भुसावळ शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष,रस्सी खेच संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष,याचबरोबर गुजराथ विधानसभा निवडणूक 2003, मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2008, गुजराथ लोकसभा निवडणूक 2009, गुजराथ विधानसभभा निवडणूक 2012, राजस्थान विधानसभा निवडणूक 2013 या ठिकाणी जावून भाजपा संघटेनेच काम केले आहे.या निवडी बद्दल ना.गिरिष महाजन यांनी अभिनंदन केले आहे.