भाजपाचे माजी खासदार हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी

0

दोषीवर कारवाई करण्यासाठी फैजपूर पोलिसात तक्रार : मनोविकृतावर कारवाईची मागणी

भुसावळ : भाजपाचे माजी खासदार व माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना अज्ञात विकृताने फोनवर संदेश पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदर्भात माजी आमदार जावळे यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांशीही चर्चा केली आहे. मी राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल रोड, जळगाव) तुमचा 33 दिवसानंतर खून करेल, असे या विकृताने पाठवलेल्या संदेशात नमूद आहे.

मनोविकृताचा शोध घेण्याची मागणी
खिर्डी येथील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांनादेखील जळगाव येथील राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, जळगाव) या नावाने संदेश देत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहेत तर यापूर्वी भुसावळातील माजी नगरसेवक परीक्षीत बर्‍हाटे व अजय भोळे यांनादेखील अशाच पद्धत्तीने जीवे ठार मारण्याचा संदेश पाठवण्यात आल्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र आरोपीला पकडण्यात यश आलेले नव्हते.

पोलिसांनी कठोर कारवाई करावी : हरीभाऊ जावळे
गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात आपले कुणाशीही वैमनस्य नाही त्यामुळे अशा पद्धत्तीने मोबाईलवर धमकी आल्याने फैजपूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कानावरही हा प्रका टाकण्यात आला आहे. जो कुणी हा धमकी देणारा इसम असेल त्याचा पोलिसांनी शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची करण्याची गरज असून आपला पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्‍वास असल्याचे माजी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले.