भाजपाचे आमदार मंगेश चव्हाणांसह दिडशे जणांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने शंभर जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देशन दिलेले असताना दिडशे जणांवर सोबत घेऊन मिरवणुक काढली म्हणून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांवर आज शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पाश्वभूमीवर शिवजयंती शंभर जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे निर्देशन जिल्हाधिकार्‍यांनी घातले होते. मात्र शिवजयंतीच्या दिवशी दि. १९ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानक चौक ते सिग्नल चौक दरम्यान आमदार मंगेश चव्हाण सह दिडशेच्या वर कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढली. त्यामुळे नियमांचे पायमल्ली केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण सह सौरभ अशोक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक चिरागुद्धीन शेख, दिपक सिंग ईश्वरसिंग राजपूत, बबन पवार, कैलास पाटील, नगरसेवक नितीन रमेश पाटील, कल्पेश पाटील, करण राजपूत, अनिकेत गवळी, भागवत बाळु पाटील, पंकज पाटील, प्रमोद वाघ, दर्शन शिंदे, शुभम पाटील, कुणाल पाटील, योगेश कुमावत व इतर शंभर ते दीडशे अज्ञातांवर आज शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिस पंढरीनाथ दशरथ पवार ब.नं. २८७९ यांनी फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास स.पो.नि. किरण दांडगे करणार आहे.

Copy