भाजपच्या प्रवक्त्यांची निवड जाहीर; पडळकरांवर मोठी जबाबदारी

0

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज १७ ऑगस्टला भाजपचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यात गेल्या महिन्यातच भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांच्यावरील टीकेमुळे पडळकरांचा फायदा झाल्याची चर्चा आहे. भाजपाने त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून गेल्या महिन्यातच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आज 10 प्रवक्ते व 33 पॅनल सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

निवड झालेल्या प्रवक्त्यांची यादी

मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये

प्रवक्ता –
खा.भारती पवार – उत्तर महाराष्ट्र,
आ‍.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,
आ. राम कदम – मुंबई,
शिवराय कुलकर्णी – विदर्भ,
एजाज देखमुख – मराठवाडा,
भालचंद्र शिरसाट – मुंबई,
धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र,
राम कुलकर्णी – मराठवाडा,
श्वेता शालिनी – पुणे,
अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.

पॅनेलिस्ट सदस्य
गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.

Copy