भाजपचे अनेक बडे नेते महाविकास आघाडीत प्रवेश करणार : राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे वक्तव्य

0

नागपूर: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलले असून भाजपमधील अनेक बडे नेते आमचं संपर्कात आहे, आगामी काळात ते शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यातील अनेकांचा प्रवेश झाला असून अनेक नेते लवकरच प्रवेश करतील असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये अनेक नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Copy