भाजपकडे प्रांत वाद नाही; मनसे-भाजप युतीची शक्यता कमीच: खडसे

0

मुंबई : मनसेचे आज 23 रोजी पहिले महाअधिवेशन होत आहे. सकाळी मनसेने पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप एकत्र येतील. हिंदुत्वाच्या मुद्दयावर त्यांची युती होईल अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र माजी मंत्री भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप आणि मनसेकडे हिंदुत्वाचा एकच धागा असला तरी मनसे-भाजपची युती होणार नाही असे म्हटले आहे. भाजपकडे व्यापक हिंदुत्व आहे असेही खडसे यांनी सांगितले.

मनसे आणि भाजपमध्ये हिंदुत्वाचा धागा असला तरी भाजपचे व्यापक स्वरुप आहे. भाजपकडे प्रांत वाद नाही. त्यामुळे मनसे आमच्यासोबत येईल असे वाटत नाही. मनसेचे जर परकीयाचे धोरण असेल तर त्यात बदल करुन अनुकरण करतील त्यावेळीचा हा प्रश्न आहे. आज तरी मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता जवळपास नसल्यासारखी आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून अनुभवलेल्या राजकारणावरून कोण-कधी एकत्र येईल सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणात काय घडेल हे सांगता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Copy