Private Advt

धक्कादायक ! भाच्याने मित्राच्या मदतीने मामीवर बलात्कार

भोपाळ : भाच्याने मामीवर मित्राच्या मदतीने अत्याचार केला.मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गँगरेपचा प्रकार घडला. कामाच्या निमित्ताने खोलीत बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केलं. सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपीने मामीला गुंगीचे औषध पाजले होते.

मामीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओही नराधम भाच्याने शूट केल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना 31 डिसेंबरच्या संध्याकाळी ग्वाल्हेरमधील हनुमान नगर गोला मंदिरात घडली होती. यानंतर भाच्याने मामीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

टिकमगड येथे राहणारी 21 वर्षीय महिला तिच्या पतीसोबत ग्वाल्हेरमधील गोल का मंदिर येथे असलेल्या हनुमान नगरात भाड्याच्या घरात राहते. कविताचे पती शेजारीच मजुरीचे काम करतात. याच ठिकाणी काही अंतरावर तिच्या पतीचा भाचा राहतो. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी भाच्याने मामीला फोन करून काही तातडीचे काम असल्याने घरी येण्यास सांगितले.

मामाच्या मोबाईलवर न्यूड व्हिडीओ पाठवला
घटनेच्या दोन दिवसांनी आरोपींनी मामीला पुन्हा आपल्या खोलीत बोलावले. मामीने विरोध केल्यावर त्याने मामाच्या मोबाईलवर तिचा न्यूड व्हिडीओ पाठवला. व्हिडिओ समोर येताच मामीने मामाच्या मदतीने गोला मंदिर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

गँगरेप करुन व्हिडीओ शूट
मामी जेव्हा भाच्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याचा मित्र आकाश माहूर हाही तिथे होता. दोघांनी मामीला प्यायला पाणी दिलं. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्याचवेळी भाचा आणि त्याच्या मित्राने मामीवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचे निर्वस्त्र व्हिडीओ शूटही केले.

मामाला जीवे मारण्याची धमकी
कोणालाही काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करून मामाला गोळ्या घालू, अशी धमकी घटनेनंतर दोन्ही आरोपींनी दिली. यानंतर घाबरलेली महिला घरी परतली, मात्र आरोपी भाच्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 9 जानेवारी रोजी आरोपीने फोन करून महिलेला घरी येऊन आपल्याशी शारीरीक संबंध ठेवण्यास सांगितले.