भागवत पारायण सभामंडपाचे भूमिपूजन

0

फैजपूर : वै. नथ्थूसिंग बाबा राजपूत जन्मशताब्दी वर्ष, वारकरी शिक्षण संस्था आळंदी शताब्दीवर्ष, वै. डिगंबर महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर रौप्य महोत्सवानिमित्त येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीने आयोजित एकनाथी भागवत पारायण व नामसंकीर्तन सोहळ्याच्या मंडपस्थळी भूमिपूजन गणेश पाटील यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास जिल्हाभरातील भक्तांची उपस्थिती लाभणार आहे. दर तीन वर्षांतून संपन्न होत असलेल्या या सप्ताहात वै. नथ्थूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळाचे टाळकरी उपस्थित असतात. भूमिपूजनप्रसंगी समिती अध्यक्ष चोलदास पाटील, सचिव नरेंद्र नारखेडे, सदस्य चंद्रशेखर चौधरी, अनिल नारखेडे, डॉ. नितीन महाजन, सी.के. चौधरी, अप्पा चौधरी, विलास नेमाडे, विजू परदेशी, एन.डी. चौधरी, नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

26 डिसेंबर ते 4 जानेवारीदरम्यान दररोज सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 भागवत पारायण, संध्याकाळी 5 ते 6 हरीपाठ असा कार्यक्रम असून रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होईल.