भरारी फाऊंडेशन, व वर्धिष्णू सेवेचा अव्याहत वसा

0

जळगाव- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत १५०० परिवाराला किमान १५ दिवस पुरेल इतकं अन्नसाहित्य वाटप करून भरारी फाउंडेशन व वर्धिष्णू संस्थांनी आपला सेवेचा वसा अव्याहत सुरू ठेवला आहे.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतराजीत विखुरलेल्या अंबापाणी व थोरपाणी या आदिवासी गावातील १५० परिवारंपर्यंत अन्नसामुग्री पोहचवण्यात आली.उदयोजक रजनीकांत कोठारी ,कृषी अधिकारी अनिल भोकरे , सुभाष राऊत ,डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी , प्रशांत पाटील, मयूर चौधरी, डॉ.सुभाष पवार ,अजय पाटील, एम. एन. ऍग्रो इंडस्ट्री यांचे सहकार्य मिळत आहे. भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, अद्वैत दंडवते, चेतन पाटील गुलाब तडवी यांनी आदिवासी परिवारंपर्यंत ही सामग्री पोहचवली.तर किट पॅकिंग साठी प्रणाली सिसोदिया, मंगला जाधव, अनिता साळवे, विजया राधे, सिद्धू, महेश जोशी, पूनम गजरे, योगेश हिवरकर मेहनत घेत आहेत.आजपर्यंत विविध दुर्लक्षित घटक शोधून विविध स्तरावरील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न या संस्थांच्या वतीने केला जात आहे.
यापुढेही हे सेवा कार्य सुरूच राहील असे दीपक परदेशी व अव्दैत दंडवते यांनी कळविले आहे.

Copy