भरारी फाऊंडेशन व के. के. कॅन्सचा सेवाभावी उपक्रम

0

जळगाव : सध्याची लॉक डाऊनची परिस्थिती सगळ्यांच्या आरोग्यासाठी व कोरोनाची साखळी तुटण्यासाठी महत्वाची आहेच. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची उपजीविका या कोरोनाने हिसकावून घेतली आहे.

भरारी फाउंडेशनने अशा अनेक वाड्या, वस्त्या व गरीब कुटुंबांना भेटून त्यांची विवंचना समजून घेत किमान लॉक डाऊनच्या गंभीर परिस्थिती असे पर्यंत त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी घेतली. या चांगल्या विचाराला लगेच के. के. कॅन्सचा उदार हात लाभला. नवजीवन प्रोव्हिजनने ना नफा ना तोटा तत्वावर साहित्य उपलब्ध करून दिलं. किड्स गुरुकुलने वाहन उपलब्ध करून दिलं.

भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी आदेश ललवाणी रामचंद्र पाटील योगेश हिवरकर सुनील जावळे आयुष मणियार पियुष मणियार व सवंगड्यानी एकूण 7 किलो धान्य एकत्र करून त्याचे पॅकिंग करून गरीब व गरजू परिवारंपर्यंत पोचवलं. या पॅकेज मध्ये 2 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो खाद्यतेल, 1/2 किलो डाळ, अर्धा किलो रवा, 1/2किलो मसाला, 1किलो मीठ व साबण अशी गरजेची अन्नसामग्री 140 गरीब परिवारंपर्यंत पोचवली.

लॉक डाऊन सुरू असेपर्यंत हे कार्य सुरूच ठेऊ असे भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी यांनी कळवले आहे.