Private Advt

भरधाव बस व कारमध्ये अपघात : दोघे प्रवासी जखमी

कुर्‍हाकाकोडा :  भरधाव बस व चारचाकी समोरा-समोर धडकल्याने झालेल्या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. रविवार, 19 रोजी संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास चारठाणा फाट्यावर हा अपघात घडला.

कार चालकाविरोधात गुन्हा
मुक्ताईनगरकडून कुर्‍हाकडे जाणारी बस (एम.एच.40 एन. 0959) चारठाण्या फाट्यानजीक आल्यानंतर कुर्‍हाकडून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने जाणारे स्वीप्ट (एम.एच.30 एफ. 7790) मध्ये धडक झाल्याने बसमधील प्रवासी रत्नकला शालिग्राम उदयकार (वढोदा) व रंजना ब्रिजलाल हरसोडे (पातोंडी) हे जखमी झाले तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. बस चालक बाबुराव विष्णू महाले (फुलगाव) यांच्या फिर्यादीवरून कार चालक राजाराम तुकाराम घोलप (तेल्हारा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप इंगळे, सागर सावे, संजय लाटे, राहुल नावकार, संभाजी बिजागरे करीत आहेत.