Private Advt

भरधाव दुचाकी शिवशाही बसवर आदळली : दोघे जखमी

जळगाव : भरधाव दुचाकी बसस्थानकात शिरत असलेल्या शिवशाही बसवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे जखमी झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवीन बसस्थानकात अपघात
शहरातील नवीन बसस्थानकात रविवार, 22 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एम. एच. 06, बी डब्ल्यू 0893) ही जळगाव बसस्थानकाच्या आवारात गेटमधून जात असताना कोर्ट चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाणार्‍या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी (एम.एच. 19 डी.एम.7606) बसच्या पाठीमागील भागावर आदळवली. या धडकेत दुचाकीस्वारासह सोबत असलेला एक जण जखमी झाला. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेबाबत शिवशाही बसचालक धीरज प्रल्हाद पवार (43, पोलिस लाईन, धुळे) यांच्या फिर्यादीवरून रविवार, 22 मे रोजी रात्री 10 वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.