भरधाव दुचाकी भिंतीवर आदळून शिवपूर कन्हाळ्यातील तरुणाचा मृत्यू

2

भुसावळ : शिवपूर कन्हाळा एमआयडीसीतील गोदामाच्या भिंतीवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास एमआयडीसी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. या अपघातात आसीफ इमाम गवळी (28) याचा मृत्यू झाला तर अन्सार रशीद गवळी (22) हा जखमी झाला आहे. वरणगाव पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Copy