भरधाव तवेरा गाडीने घेतल्या तीन पलट्या

0

जळगाव :अंजिठा चौफुलीकडे डिझेल भरण्यासाठी जात असलेल्या तवेरा गाडीसमोर अचानक दुचाकी आल्याने चालकाने जोरात ब्रेक लावला. यात गाडी अपघातग्रस्त होऊन तीन पलट्या घेतल्या. यात गाडीतील दोघी किरकोळ जखमी झाले. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास हॉटेल कस्तुरी जवळ घडली. दरम्यान, तवेरा गाडी गयाबाई राजाराम रायते रा. रामेश्‍वर कॉलनी यांच्या मालकीची असल्याचे समजते.

गयाबाई रायते यांचा मुलगा गजानन रायते हे भाडेतत्वावर गाडी देत असत. त्यामुळे गजानन रायते यांनी औरंगाबाद येथील ट्रीप घेतली होती. त्यामुळे औरंगाबाद येथे जायचे असल्याने मंगळवारी सकाळी गजानन रायते हे चालक गजानन (पुर्ण नाव माहित नाही) याच्यासह तवेरा गाडीतून अंजिठा चौफुलीकडे डिझेल भरण्यासाठी जात होते. हॉटेल कस्तुरी जवळून सकाळी 7 वाजेच्या सुमारास जात असतांना त्यांच्या गाडीसमोर अचानक दुचाकी समोर आली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक गजानन याने जोरात ब्रेक लावला. यात नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याखाली उतरल्यानंतर गाडीने तीन पलट्या मारल्या. तीन पलट्या घेताच गाडी रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला आयशर गाडीला धकडली. या अपघात तवेराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, चालक व गजानन रायते यांना किरकोळ जखमी झाले आहेत. अशी माहिती राजाराम रायते यांनी दिली. तसेच याबाबात पोलीसात कोणतीही नोंद नाही.