भरधाव ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

0

भुसावळ । भुसावळ येथून जळगावकडे जात असतांना ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 12 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर असतांना कोणतीही मदत न केल्याने मयताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. येथील लोकोगेट परिसरातील आगवाली चाळीतील रहिवासी त्रिबेन बद्रीप्रसाद चापरे (वय 32) हे जळगावकडे जात असतांना भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने धडक दिली असता यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पेट्रोलिंगसाठी आलेल्या पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना सौजन्य दाखविले नाही. मयतास उचलून पालिका रुग्णालयात आणले असता नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंद सुरु होते.