भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : जळगावातील दोघे मित्र जखमी

Two bike riding friends from Jalgaon were seriously injured after being hit by a speeding truck जळगाव : भरधाव ट्रकने जळगावातील दोघा मित्रांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघे मित्र जखमी झाले. हा अपघात जळगाव तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ शनिवारी रात्री दिड वाजता घडला होता. या प्रकरणी रविवारी अज्ञात ट्रक चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टायर गोदामाजवळ अपघात
जळगावच्या सिंधी कॉलनीतील अक्षय वासुदेव कुकरेजा (24) व अमित पाहुजा हे दुचाकीने शनिवार, 24 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास नशिराबाद-जळगाव या रस्त्याने येत असताना तरसोद फाट्याजवळ टायर कंपनीच्या गोडावून समोर जळगावकडून येणार्‍या ट्रकने अक्षय कुकरेजा याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अक्षय व दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र अमित पाहुजा हे दोन्ही रस्त्यावर फेकले जावून गंभीर जखमी झाले. घटनेत अमित पाहुजा याचा मोबाईल फुटून त्याचे नुकसान झाले. याप्रकरणी दुचाकीस्वार अक्षय कुकरेचा याच्या तक्रारीवरुन रविवारी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.