भरधाव चारचाकीच्या धडकेत जळगावचा दुचाकीस्वार जखमी

पाडळसे : भरधाव चारचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. मोर नदीपुलाजवळ रविवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. फैजपूरकडून येणारी मारुती सुझुकी (एम.एच. 02 बी.टी.0840) ने फैजपूरकडे जाणार्‍या दुचाकी (एम.एच.सी.बी.9976) ला धडक दिल्याने दुचाकीस्वार राहुल ठाकरे (30, रा.जळगाव) हा जखमी झाला. दुचाकीस्वाराच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली असून त्यास भुसावळातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.