भरधाव कंटेनरच्या धडकेत पिंप्राळ्यातील पिता-पूत्र ठार, चालकास अटक

जळगाव- मामाच्या घरी राहत असलेल्या पाच वर्षीय मोठ्या मुलाला घेण्यासाठी जात असलेल्या मोटारसायकलस्वाराला भरधाव कंटनेरने शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळील बोगद्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर चिरडले. यात मोटारसायकलस्वार नागेश्‍वर पवार (वय 35) यांच्यासह मोटारसायकलवरबसलेला त्यांचा मुलगा कार्तिक नागेश्‍वर पवार (वय 5 वर्ष, दोन्ही रा. दत्त गॅरेजजवळ, पिंप्राळा) यांचा मृत्यूझाला.
अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. नागरिकांच्या संतप्त जमावाने घटनास्थळावरील कंटेनरची तोडफोड केली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल झाला. गुजराल पेट्रोलपंप परिसरात घटनास्थळाच्या परिसरात लपून बसलेल्या कंटनेरचालक अर्जुनकुमार सिंग (वय 65, रा. कोलकत्ता) यास पोलिसांनी शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतल.

Copy