Private Advt

भरधाव एस.टी.च्या धडकेत पिंपळगावचा दुचाकीस्वार ठार

भुसावळ : भरधाव एस.टी.ने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात पिंपळगाव बु.॥ येथल 42 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तळवेल फाट्याजवळ घडला. प्रल्हाद लक्ष्मण झोपे (42) असे मयताचे नाव आहे.

जागीच झाला मृत्यू
प्रल्हाद झोपे हे दुचाकी (एम.एच.19 ए.जी.3783) ने राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हीस रोडने तळवेल गावाकडे येत असताना मुक्ताईनगरकडून वरणगावकडे जाणार्‍या बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.2414) ने जबर धडक दिल्याने झोपे यांचा जागीच मृत्यू झाला तर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनीही मयत घोषित केले. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले. अपघात प्रकरणी वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.