भडगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

0

भडगाव । शहरातील वाणी मंगल कार्यालयात नुकतेच संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाज बांधवांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. समाज अध्यक्ष संजय चौधरी, नाना चौधरी, उत्तमराव चौधरी, पि. बी. चौधरी, वनजी चौधरी आदि जेष्ठ मंडळींनी प्रतीमा पुजन केले. यावेळी तालुका व शहर युवा कार्यकारर्णी जाहीर करण्यात आली. तालूकाध्यक्ष्य विशाल सुभाष चौधरी, तालुकाउपाध्यक्ष निलेश रामदास चौधरी, शहरध्यक्ष राहूल उत्तम चौधरी, खजिनदार हर्षल चौधरी. सुञसंचलन अजय चौधरी यांनी केले. तसेच भोला महाराज जळगावकर यांचा साई भजन संध्या कार्यक्रम आझाद चौक येथे आयोजीत केला होता. नागरीकांनी उत्कृष्ठ प्रतीसात दिला.यावेळी विशाल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने समाज सुंदर केला पाहीजे, तरच देश सुंदर होईल. हि भावना प्रत्येकाने अवलंबली तर देशाची प्रगती होईल असे मनोगत व्यक्त करताना सांगितले.