भडगाव यशवंतनगर विविध समस्यांच्या विळख्यात

0

क्षारयुक्त पाणी पुरठ्याने वाढले पोटांचे आजार

भडगाव : शहरातील यशवंतनगर प्रभाग क्र.पाच मध्ये नागरिकांच्या मुलभुत सुविधांकडे नगरपरिषदेसह नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनामध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. या प्रभागात जाण्याचा मुख्य रस्त्यावरील शिवनेरी गेट जवळील वळणावर गटारीवरील ढाप्यावर तीन ते चार महीन्यापासुन खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. या अपघातात नागरिकांना इजा पोहचणे, वाहनाचे नुकसान होण्यासारख्या घटना घडत आहेत. या प्रभागात एकूण 5 नगरसेवक आहेत. हे सर्व नगरसेवक या खड्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासोबतच इतर भागातदेखील गटारीवरील ढापे तुटलेले आहेत. या प्रभाग क्र. 5 मधून 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु, प्रत्यक्षात एकही नगरसेवक या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. नागरिक सार्वजनिक शौचालय, मुतारी, उद्यान सारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत. काही भागात शौचालय उभारण्यात आले आहेत. परंतु, त्यांची योग्यती देखभाल, स्वच्छतेअभावी ही शौचालय नागरिकांसाठी कोणत्याही उपयोगाचे राहत नाही. तसेच शहरात क्षारयुक्त पाणी पुरवठा नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. या क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर काही नागरिकांना पोटांच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तसेच

क्षारयुक्त पाणी आज ही मिळत असल्याने आरोग्य बिघडत आहे.काही महिन्यापुर्वी नगरपरिषदे कडुन लाखो रुपये खर्च करुन नवीन पाईप लाईनद्वारे पाणी आणाले मात्र जुन्या विहीरीवरुन क्षारयुक्त पाणीपुरवठा केला जात असुन लोकप्रतिनिधी कडुन दुर्लक्ष होत आहे.
अनिल महाजन

शिवाजीनगर सारखा भाग आजही रस्ते व गटारीसह अन्य मुलभुत सुविधापासुन वंचित आहे. नगरपरिषदेला या भागातुन सर्वात पहीले कर जमा केला जातो.मुख्याधिकारी यांनी शहराचा अभ्यास करुन विकास कामांचे नियोजन करावे.
 प्रशांत कुंभारे
                                                                                                                                                                       माजी शहरध्यक्ष भाजपा

ढापा दुरुस्तीचे टेंडर निघाले नसल्यामुळे व दुरुस्तीचे नगरपरिषदेत काही नियोजन नाही. मात्र शिवनेरी गेट जवळील तुटलेला ढापा मी स्वखर्चाने दुरुस्ती करणार आहे.
वैशाली महाजन
                                                                                                                                                                              नगरसेविका