Private Advt

भडगाव तालुक्यातील महिलेचा विनयभंग

भडगाव : भडगाव तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग
भडगाव तालुक्यातील एका गावात महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 22 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता गावातील संशयीत बापू हिरामण पाटील याने महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत साडी ओढून महिलेला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी बापू पाटील याच्या विरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल पंचशीला निकम करीत आहे.