Private Advt

भडगाव-चाळीसगाव बसमधून महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास

चाळीसगाव : भडगाव-चाळीसगाव दरम्यान बसमधून प्रवास करणार्‍या प्रवासी महिलेच्या बॅगेतून दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने चोरून नेले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा
शोभा शिवाजी पाटील (53, रायगड नगर, सिडको, औरंगाबाद) या शनिवार, 16 एप्रिल रोजी 10 ते 11 च्या दरम्यान कामाच्या निमित्ताने भडगाव ते चाळीसगाव दरम्यान बसने प्रवास करीत होत्या. नगरदेवळा दरम्यान एका अनोळखी महिलेने त्यांच्या बॅगेतून दोन लाख तीन हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार चाळीसगाव बसस्थानकात उतरल्यानंतर शोभा पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.