भडगावात बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीस अळथळा

0

शहरातुन जाणारा मुख्य रस्तावर पारोळा चौफुली ते पंचायत समितीपर्यंत चारचाकी व दुचाकीधारक हे बेशिस्त पद्धतीने भर रस्त्यावर वाहन लावून खाजगी कामा करता निघुन जातात अथवा चहा हॉटेलवर वेळ काढत गप्पा मारत असतात. अनेक वाहनधारक दिसुन येतात. बसस्थानक परिसर असल्यामुळे याच रस्त्यावर खेड्यावर जाणार्‍या प्रवासी वाहने खाजगी वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे वाहतुकीस अळथळा निर्माण होत असुन पोलिसांनी मात्र बघ्याची भुमिका घेतल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पारोळा चौफुली याभागात प्रवासी रिक्षावाले टॅक्सीवाल्यांनी पारोळारोड व्यापून टाकल्याने बसस्थानकाबाहेर बस निघतांना छोटे मोठे आपघात वाहनधारकांमध्ये वाद होतात.

किरकोड अपघातानंतर वाहनचालकांमध्ये वाद
किरकोड अपघातानंतर प्रकारचे घटना वारंवार घडतात बसस्थानकामधून पाचोरा रस्त्यावर पंचायत समितीपर्यंत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पाचोरा रस्त्यावर प्रवासी वाहने मोटरसायकलीसह रस्त्यावर उभे राहतात. परिणामी रस्ता व्यापला जातो बसस्थानकासमोरील बढेसर काँम्पलेक्ससमोर लोखंडीपाईप लावल्यामुळे तसेच पार्कीगची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरच गाडी लावून निघून जातात. अशा बेशिस्त वाहनधारकांनवर कारवाई होणे गरजेचे असून वाहतुक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे. याकडे पोलिस निरीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.