Private Advt

भडगावला महिला दक्षता समितीचा ‘सावित्रीचे वाण’ अनोखा उपक्रम

 

भडगाव। महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन भडगावच्यावतीने ‘सावित्रीचे वाण’ एक अनोखा उपक्रम नुकताच महिलांसाठी राबविण्यात आला. संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुवासिनी महिलांसाठी होत असतात. परंतु विधवा परित्यक्ता महिलांना कार्यक्रमात बोलावले जात नाही. अशा अंधश्रद्धा निर्मूलनाचा भाग म्हणून एक नाविन्यपूर्ण उपक्रम ‘सावित्रीचे वाण’ या उद्देशाने कोरोना काळात दुर्दैवाने पतींचे निधन झाले. अशा महिलांसाठी व समाजात ज्या महिलांचा सन्मान होत नाही. अशा मजुरी करणार्‍या, मजूर राबविणार्‍या, मार्गदर्शन करून रोजगार उपलब्ध करून महिलांचा सन्मानासाठी ‘सावित्रीचे वाण’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उपस्थित सुवासिनी, विधवा, परितक्त्या महिलांनी परिचय करून संघर्षमय जीवनातील अनुभव कथन केले. महिलांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या शेतात उपयोगी सनकोट, शाल व उपयोगी भेटवस्तू, विधवा महिलांना साडी व गिफ्ट, सुवासिनी महिलांना भेटवस्तू, तिळगुळ वाटप करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जीवनात संघर्ष करण्यासाठी एक नवी उमेद घेऊन आलेल्या प्रत्येक संकटावर आपण महिला एकमेकांना साथ देऊन मार्गक्रमण करू या व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करू या असा संकल्प केला. यासाठी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पो.कॉ. स्वप्निल पाटील, हवालदार विलास पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महिला दक्षता समितीचे मार्गदर्शन लाभले.

यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी समिती सदस्या अनुक्रमे रेखा पाटील, नूतन पाटील, लता पाटील, साजिदा शेख, माई बोरसे, अस्मिता चव्हाण, कविता महाजन, दीपाली अहिरे, मनीषा हाडपे, दुर्गा पवार, उषा सोनवणे, वैशाली गायकवाड, अरुणा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील तर सूत्रसंचासलन उपाध्यक्ष मिना बाग यांनी केले.