भगवान परशुराम जयंती घरातच राहून साजरी करा

0

भुसावळ : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे यंदा भगवान परशुराम जयंती घरीच साजरी करावी, असे आवाहन जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. दरवर्षी सर्व भाषिक ब्राह्मण समाजातर्फे परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदा ही शोभायात्रा कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबत परशुराम जयंती उत्सव समितीने कळविले आहे की, समाजबांधवांनी जयंती आपापल्या घरी साजरी करावी. शनिवार, 25 रोजी भगवान श्री परशुराम जयंती असून भगवान श्री परशुराम जयंती उत्सव समितीतर्फे सोशल डिस्टन्सिंग सह शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत या दिवशी गरजुंना अन्नदान व मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

Copy