भगवान परशुराम जयंतीनिमित्तच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

0

जळगाव। भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीने जळगावकरांचे लक्ष वेधले.महाबळ परिसरातील भगवान परशुराम सेवा समिती व बहुभाषिक ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाबळ चौकापासून रॅलीला सुरवात झाली. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ऍड. सुशिल अत्रे व , बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला सुरवात झाली.

रॅलीचा यशस्वीतेसाठी परशुराम समितीच्या महाबळ परिसराचे भुपेश कुळकर्णी, किरण कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, राजेश नाईक, निलेश कुळकर्णी, अमोल जोशी, भुषण मुळे, नितीन कुळकर्णी, सुनिल याज्ञीक, अभय जोशी, गजानन जोशी, संकेत तारे, रोहन जोशी, तेजस जोशी, सुरेंद्र मिश्रा, अशोक वाघ, छोटू उपाध्यय, पियुष रावल, शैलेश कुळकर्णी, हर्षल बर्हाणपूरकर, उल्हास नाईक यांनी परिश्रम घेतले.

मोटारसायकल रॅलीला महाबळ चौकातून सुरवात झाली. त्यानंतर रॅली काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, रिंगरोड, ख्याँजामिया चौक, कोर्ट चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवर मार्ग, ब्राह्मण सभे ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. मोटारसायकल रॅलीत मोठया संख्येने समाजबांधव पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. रॅलीच्या सुरवातीला ढोल ताशा वाजविणार्या 100 मुलींचे पथक होते. त्यानंतर महिला व नंतर पुरुष असे शिस्तबध्द पध्दतीने भगवान परशुरामांच्या जयघोषात मोटारसायकल रॅली मार्गक्रमण झाली. मोटारसायकल रॅलीचे चौका चौकात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले