भगवंतावर श्रद्धा ठेवून मंदीरात जावे

0

नवापूर । भगवंतावर आपली श्रद्धा ठेवून प्रत्येकाने मंदिरात गेलेच पाहिजे मंदिरात चांगले संस्कार मिळतात, चांगले जीवन जगण्यासाठी दररोज सत्संग केला पाहिजे, सत्संगातून अनेक समस्यांचे निराकरण होत असते. नियमित सत्संग केल्याने जीवनात परिवर्तन होते, असे स्पष्ठ विचार उकाई स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत पूज्य शुभदर्शन स्वामी यांनी व्यक्त केलेत. शहरातील साई नगरातील बीएपीएस स्वामीनारायण संस्कारधामच्या आकाराव्वा पटोत्सव निमित पूज्य शुभदर्शन स्वामी, पूज्य देवरत्न स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा, अन्नकुट दर्शन, सत्संग प्रवचन, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध उदाहरणे देत मंदिरांचे जीवनातील महत्व
यावेळी पुढे प्रवचनात पूज्य शुभदर्शन स्वामी म्हणालेकी प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना बालसंस्कार केंद्रात नियमित पाठविले पाहिजे चांगल्या संस्कारातून जीवन अधिक चांगले घडत असते. विविध उदाहरणे देत मंदिरांचे जीवनातील महत्व विषद केले. यावेळी हरिष प्रजापत, कांती प्रजापत, धनजी प्रजापत यांनी आपली सुरेल आवाजात भगवान स्वामीनारायण यांची भजने गायलीत. पियुष प्रजापत व भूमीत प्रजापत यांनी प्रार्थना गायली यावेळी आदिवासीं सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, छगन प्रजापत, निमेश प्रजापत, कमलेश अग्रवाल, नगरसेवक अजय पाटील,नरेंद्र नगराळे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, नगिनभाई अग्रवाल, हरीश पाटील, राजू गावीत आदींनी पूज्य शुभदर्शन स्वामी व पूज्य देवरत्न स्वामी यांचे स्वागत केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, पुरुष -महिला बाळ गोपाल मोठ्या संखेने उपस्थित होते. स्वामीनारायण संस्कारधामच्या अकरावा पाटोत्सव निमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सूत्रसंचालन भटू जाधव प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा.आर.आर. पाठक तर आभार प्रदीप प्रजापत यांनी मानले. यशस्वीतेसाठी स्वामीनारायण सत्संग मंडळाचे बंधू भगिनींव युवकांनी परिश्रम घेतले.