भक्ती-शक्ती स्थानकात पोलीस नागरिक मित्रांची स्वच्छता मोहिम

0

पिंपरी : रविवारी पोलीस नागरीक मित्र सामाजिक संस्थेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता आवाहनामध्ये आपलेही योगदान देण्याच्या दुष्टीने अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल शक्ती-भक्ती, निगडी येथे स्वच्छता करण्यात आली. यावेळी पोलीस नागरिक मित्र संस्थेचे तीस सदस्यांनी व पालिका कर्मचार्‍यांनी मिळून पुर्ण बसस्टॉप व आजुबाजुचा संपुर्ण परीसर स्वच्छ केला.

नेहमीप्रमाणे उद्घाटन, बॅनर, भाषण न करता स्वच्छता केली ते बघुन पी.एम.पी.एल.स्थानकातील वाहतुक नियंत्रकांतर्फे आभार मानण्यात आले. उपस्थीत आगार प्रमुख रेगंडे सर, स्थानक प्रमुख सुभाष जाधव सर तसेच स्थानक कंट्रोलर पुरुषोत्तम काळभोर यां सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले व आभारपण मानले. यावेळी संस्थेचे सचीव राहुल श्रीवास्तव यांनी बस टर्मीनलला स्वच्छता अभियान राबवण्याची परवानगी दिल्याबद्दल पी.एम.एम.एल.चे आभार मानले. तसेच पालिका कर्मचार्‍यांनी सफाई केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. अनिकेत गायकवाड यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे सुध्दा आभार मानले. या कार्यात उपस्थित संस्थेचे महीला व पुरुष सभासदांचे आभार मानले. याप्रसंगी स्मिता डेरे, विनीता आंबेरकर, विमल गायकवाड, राजश्री पोटफोडे, शोभा देशपांडे, माया गायकवाड, बि.सुर्यवंशी, दिलीप गडदे, उमेश दरेकर, राजीव बंसल, सतीष सावंत, संदीप मत्रे, शाम तावडे, संतोष पाटील, नरेंद्र मराठे, रविंद्र शिंपी, रमेश भोंडवे, जितेंद्र मत्रे, धनराज पवार, संतोष पवार, प्रथमेश आंबेरकर, गायकवाड हे सर्व उपस्थित होते

Copy