भंगाळे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेतर्फे वृक्षारोपण

0

जळगाव : युवा विकास फॉऊंडेशन संचलित सि.ग.भंगाळे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून भोरगाव लेवा पंचायत पाडळसेचे कुटुंबनायक रमेश पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, भोरगाव लेवा पंचायतचे सदस्य डॉ.प्रमोद इंगळे, मनोकल्प अ‍ॅग्रोटेकचे संचालक मनोज वाणी, अ.भा.लेवा विकास महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, पंकज काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, विवेक नेहते, अनुपमा कोल्हे, हरित सेनेचे प्रमुख सचिन महाजन, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भूषण भोळे व हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.