ब्राह्मण समाजातील उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार

0

जळगाव। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक रविवारी 26 रोजी ब्राह्मण सभा येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण परिषदेवर भरत अमळकर यांची निवड झाल्याबद्दल तर वैद्य जयंत जाहागीरदार यांना राष्ट्रीय आयुवर्वेदिक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच धरणगाव नवनिर्वाचित नगरसेवक विनय भावे, अमळनेर प्रविण पाठक, पारोळा मंगेश तांबे, जामनेर अ‍ॅड.सतिष साठे, जळगाव अनंत जोशी, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा कार्यकारिणी व विविध सहा आघाड्यांची घोषणा करण्यात आली. ह.भ.प.दादा महाराज जोशी, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष उदय महाजन, उपाध्यक्ष अशोक जोशी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अ‍ॅड.सुशील अत्रे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, रविंद्र जोशी, भरत अमळकर, वैद्य जयंत जहागीरदार, नागेश लिमये, प्राचार्य विवेक काटदरे, बापूसाहेब चिवटे, नरेंद्र देशपांडे, मोहिनी पत्की, विलास कौसडीकर, अ‍ॅड.रवी देशमुख आदी उपस्थित होते.