ब्राझीलचा सेकंड डिव्हिजन फुटबॉल क्लब बोआ एस्पोर्टेवर विश्‍वातून टिका

0

रिओ दि जानेरिओ । प्रेयसीची हिची हत्या करणारा फुटबॉलपटू यांच्याशी करार केल्यामुळे फुटबॉलच्या विश्वामध्ये ब्राझीलचा सेकंड डिव्हिजन फुटबॉल क्लब बोआ एस्पोर्टेवर जोरदार टिका केली आहे. ज्याला प्रेयसीच्या निर्घृण हत्येप्रकरणी सहा महिन्यांची ब्रुनो फर्नांडिस डिसुझा कारावासाची शिक्षा झाली. प्रेयसीची हिची हत्या करणारा फुटबॉलपटू यांच्याशी करार केल्यामुळे फुटबॉलच्या विश्वामध्ये ब्राझीलचा सेकंड डिव्हिजन फुटबॉल क्लब बोआ एस्पोर्टेवर जोरदार टिका केली आहे. ज्याला प्रेयसीच्या निर्घृण हत्येप्रकरणी सहा महिन्यांची ब्रुनो फर्नांडिस डिसुझा कारावासाची शिक्षा झाली.
खुनी फुटबॉलपटूच्या खेळण्याला विरोध; तीन प्रायोजकांची माघार

सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले
ब्रुनो फर्नांडिस डिसुझा याने प्रेयसी एलिझा सामुडिओची निर्घृण हत्या केली होती. तिच्या शरीराचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले होते. त्याला 2010 मध्ये प्रथम अटक करण्यात आली होती. 22 वर्षीय ब्रुनो ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करित होता.मात्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा दिली. या शिक्षेला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा सिध्द होईपर्यंत ब्रुनोला जामिन देवून सोडण्यात आले.दरम्यान, त्याने राष्ट्रीय संघातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याची संघातही निवड झाली. मात्र, त्याच्या या निवडीवर सर्वांनी प्रचंड रोष व्यक्त केला. याशिवाय टीमच्या तीन प्रायोजकांनी या कारणामुळे हटण्याचा निर्णय जाहीर केला.

ड्रग्ज पार्टीत झाली होती पहिली भेट
ब्रुनो हा विवाहित होता. त्याला दोन मुलीदेखील आहेत. एका ड्रग्ज पार्टीमध्ये एलिझा आणि ब्रुनो यांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने भेटी होऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, एलिझाने एका मुलाला जन्म दिला. या मुलाच्या संगोपनासाठी खर्च देण्याची मागणी एलिझाने केली. मात्र, याला ब्रुनोने विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून त्याने एलिझाचे अपहरण केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात ब्रुनोसह पत्नी आणि भाच्याचाही समावेश आहे.