बौध्दधम्मीय वधू-वर परिचय मेळावा 13 मे रोजी

0

धुळे । शनिवार दि. 13 मे रोजी राज्य सहकारी कर्मचारी कल्याण भवन शिवतिर्थाशेजारी धुळे येथे सकाळी 10 वा. राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून आयु.महेंद्र निळे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वैद्य (मालेगाव), जीभाऊ एम.जी.ढिवरे, वाल्मिक दामोदर, नगरसेविका सुशिला ईशी, जयहिंद संस्थेचे चेअरमन अरूण साळुंखे, नालंदा निळे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात विवाहेच्छुकांनी आपला परिचय करून द्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष मोहन मोरे, अध्यक्ष डॉ.विलास जाधव, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुरेंद्र मोरे, राहुल वाघ, रवींद्र मोरे यांनी केले आहे. हा मेळावा यशस्वी करण्याठी बी.डी.बोरकरांच्या नेतृत्वाखालील बामसेफ संघटन, मुलनिवासी संघटन, कर्मचारी कल्याण महासंघ यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बोधिसत्व प्रतिष्ठानला सर्वोतपरी सहकार्य करीत आहेत. निकुंभे सर, सुरेश मोरे, मुकुंद मोरे, अ‍ॅड.उमाकांत घोडराज, अ‍ॅड.विशाल साळवे, दिपक जाधव, व्ही.टी.गवळे, इंजि.अमोल अहिेर, एस.एम.मोरे, प्रा.डॉ.सुरज सोनावले, रवींद्र मोरे, भिमराव जाधव, भास्कर मोरे परिश्रम घेत आहेत.