बोहर्डीनजीक रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत चालक ठार

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने हाताला काम नसलेल्या गावाकडे निघालेल्या वाहन चालकाला तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राजभोहर भारत कोल (35) असे मयताचे नाव आहे. कोल हे मध्यप्रदेशातील तिलीया गावाकडे निघाला असताना मुक्कामासाठी बोहर्डी गावाजवळील एच.एस.फिवेल पेट्रोल पंपासमोर थांबला होता. रात्री तो शौचास जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. अपघातानंतर अज्ञात आयशरचालक पसार झाला. अनिलकुमार इंधलाल सौधिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञार आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरसिंग चव्हाण करीत आहेत.

Copy