Private Advt

बोदवड शिवारात उसाला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

मुक्ताईनगर : तालुक्यातील बोदवड शेत-शिवारातील उसाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कापणीवर आलेल्या उसाला आग
बोदवड शिवारातील गट नंबर 116 मध्ये बेबाबाई जनार्दन वारूळकार (रा.कुर्‍हा) यांनी उसाची लागवड केली असून कापणीवर आलेल्या उसाला गुरुवारी दुपारी आग लागली. नजीकच्या शेतकर्‍यांसह बोदवड, धामणगाव, कुर्‍हा येथील सुनील बेलदार, महेंद्र पांडव, प्रतीक गोयंका, ईश्वर खिरळकर, कुलदीप कोंगळे, संजय कोंगळे, महादेव बेलदार आदी तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

शेतकरी पुत्राचा जीव वाचविला
बेबाबाई जनार्दन वरूळकार यांचे सुपुत्र रोशन जनार्दन वरूळकार हे आपल्या उसाला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते मात्र पेटत्या आगीत ते शिरत असल्याची पाहून तरुणांनी त्यांना वेळीच रोखले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. यावेळी घटनास्थळी ऊस कारखान्याचे कुर्‍हा विभागाचे गट प्रमुख निलेश पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली तसेच वीज कंपनी कर्मचार्‍यांनी पाहणी केली. शॉट सर्किट होऊन आग लागल्याचे शेतकरी रोशन वरूळकार यांनी सांगितले. ऊस तोडणीवर आलेला ऊस खाक झाल्याने कसे फेडायचे कसे ? असा टाहो त्यांनी यावेळी फोडला. ऊस तोडण्यासाठी संबंधीतांची देवासारखी विनवणी केली मात्र त्यांनी ऊस तोडला नाही, असेही त्यांनी सांगितले.