बोदवड शहरात 22 वर्षीय तरुणाने घरी कुणी नसताना घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट : बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

A young man committed suicide by hanging himself in Bodwad City बोदवड : शहरातील शिवद्वाराजवळील 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश मुरलीधर माळी (22) असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली मात्र तरुणाने आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पषट
बोदवड शहरातील रहिवासी रूपेश हा मोठा भाऊ दीपकसोबत वास्तव्यास होता व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास रूपेशने भाड्याने राहत असलेल्या घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याला बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी दीपक मुरलीधर माळी (25) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार शेजोळ करीत आहेत.