बोदवड शहरातून चोरट्यांनी अ‍ॅपे रीक्षा लांबवली

Thieves Hijacked An App Rickshaw From Bodwad City बोदवड : सफरचंदांच्या पेट्यांनी भरलेली अ‍ॅपे रीक्षा चोरट्यांनी शहरातील गांधी चौकातील डॉ.काजळे यांच्या दवाखान्याजवळून लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध
तक्रारदार शेख जाकीर शेख मसुद (जुना गाव परीसर, सागवन, जि.बुलढाणा) यांनी गांधी चौकात अ‍ॅपेरीक्षा (एम.एच.28 टी.1977) ही बुधवार, 21 रोजी गांधी चौकात उभी केली होती. या वाहनात 20 हजार रुपये किंमतीच्या 17 सफरचंदांच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र चोरट्यांनी बुधवारी चार ते साडेपाचदरम्यान अ‍ॅपे रीक्षा लांबवली. या प्रकरणी तपास नाईक शशीकांत शिंदे करीत आहेत.