Private Advt

बोदवड शहरातील 22 वर्षीय युवकाची आत्महत्या

बोदवड : शहरातील शारदा कॉलनीतील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, 4 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संकेत सुभाष भोई (22) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या संदर्भात समाधान फकिरा भोई (56) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संकेत भोई या तरुणाने राहत्या घरी पंख्याला दोरीने गळफास घेतला. अधिक तपास हवालदार ररवींद्र गुरचळ करीत आहेत.