Private Advt

बोदवड शहरातील 22 वर्षीय युवकाची आत्महत्या

बोदवड : शहरातील 22 वर्षीय युवकाने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. ही घटना रविवार, 6 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश विनोद काळे (22, शिवाजी नगर, बोदवड) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गणेश काळे या तरुणाने फिर्यादी संजय पंडित काळे (40) यांच्या मलकापूर रस्त्यावरील शेताच्या बंधार्‍यावरील लिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. बोदवड पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी शेजोळकर करीत आहेत.