बोदवड मुख्याधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी : दोघांना अटक

0

बोदवड : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करीत दोघांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शेख अकिल शेख इमाम (बोदवड) व शेख जावेद शेख इमाम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मुख्याधिकार्‍यांनी दिली फिर्याद
मुख्याधिकार्‍यांच्या दालनात शेख अकिल शेख इमाम (बोदवड) व शेख जावेद शेख इमाम हे बुधवारी सकाही 11.45 वाजता आल्यानंतर त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर 6 जुलै 2020 रोजी दिलेला अर्ज हा अपूर्ण असल्याचे सांगितले तसेच त्रृटींबाबत संबंधिताना सांगितले असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर उभयतांनी मुख्याधिकार्‍यांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांना शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी नगराध्यक्ष पती शे.सईद बागवान, सहा.कार्यालय अधीक्षक राजुसिंग चौहाण, अंकुश मराठे घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.

Copy